मनोरंजन - 'नेम' असा धरायचा, की शेवटपर्यंत कळलं नाही पाहिजे 'गेम' कोणाचा होणार.? या 'टॅगलाईन'सोबत 'माईंड गेम' या नव्या कोऱ्या मराठी वेब सिरीजचा पहिला टीजर युट्युबवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या 'एम के स्टुडिओ'ने या थरारपट वेब सिरीजची निर्मिती केली आहे.
जूनमध्ये युट्युबवर ही वेबसिरीज प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध होत आहे. कोरोना काळात यु-ट्यूबवर विविध विषयांवर सुरु असलेल्या 'वेब सिरीज'ना तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. याच माध्यमातून आता 'माईंड गेम' ही मराठीतील एक नवी कोरी 'वेब सिरीज' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'नेम' असा धरायचा की शेवटपर्यंत कळलं नाही पाहिजे 'गेम' कोणाचा होणार.. या 'टॅगलाईन'सोबत 'माईंड गेम' या वेब सिरीजचे पहिले मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले होते. या 'टॅगलाईन'मुळे प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण होत आहे. या व्हिडिओला रसिकांनी तुफान प्रतिसाद देत डोक्यावर घेतलेे.
काय आहे टीजरमध्ये ? - रक्तरंंजित थरारपट असलेल्या मराठी वेबसिरीजचे पार्श्वसंगीतही प्रचंड उत्सुकता निर्माण करणारे आहे. त्यामुळे अल्पावधीतच या पहिल्यावहिल्या टीजरलाही प्रेक्षकांनी अफाट प्रतिसाद दिला आहे. युट्युबवर प्रदर्शित झालेल्या या टीजरने अनेेकांची वाहवा मिळवली आहे.
मंगेश महादेव बदर हे या वेब सिरीजचे दिग्दर्शक आहेत. तर मच्छिंद्र धुमाळ निर्माता आहेत. यामध्ये रोहिदास मिसाळ, योगिता सूर्यवंशी-नळे, सोनाली गायकवाड, मंगेश बदर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर रहेमान पठाण व गणेश निमगिरे हे सहकलाकार आहेत.
विशाल सरोदे यांनी या वेब सिरीजचे एडिटिंग केले आहे. तर मेकअपची जबाबदारी रोहिणी फडतरे यांनी पाहिली आहे. त्यांच्यासह रुशिकेश मिंडे, आदित्य माने, महेश नाईक, चैतन्य साळुंके, साई माने, राजु चांदगुडे, आदींनी या वेेब सिरीजची तांत्रिक बाजू मोठ्या ताकदीने सांभाळली आहे.
मराठीतील आघाडीचे न्यूज पोर्टल www.mbplive24.com आणि 'MBP Live24' हे यु ट्यूब चॅनल या नवीन मराठी वेबसिरीजचे मिडिया पार्टनर आहे. या पोर्टलवर आणि MBP Live24 या 'यु ट्यूब चॅनल'वर आपल्याला या वेब सिरीजचे आणखी ताजे अपडेट मिळत राहतील.