'या' ऐतिहासिक शहराचा तुम्हाला हेवा वाटत असेल. पण आज..

आम्ही हे सारखं म्हणत आलो आहोत कितीतरी वर्ष, की आमचं शहर एकेकाळी कैरो, बगदाद या शहरांच्या तुलनेत सुंदर होतं...
अजून किती वर्ष तेच तेच बोलत राहायचं..
नव्या पिढीला हेचं सांगत आलो आम्ही..
तेही आता विचारू लागलेत,
मग कुठं हरवलं ते सुंदर शहर..?
पाताळात का?
भूतकाळातील स्मृती किती जागवायच्या..?
कधीतरी काहीं बोध घेणार आहोत की नाही आपण..?
गतकाळातील स्मृतींचा मागोवा घेताना उद्याच्या परिपूर्ण, आधुनिक शहराची उभारणी होणार की नाही आपल्याकडून..?

हे शहर तर केव्हाच पर्यटन रांगेतील शहर व्हायला हवं होतं...
पण नाही झालं...!
किती बोलायचं..
मागणी करायची..
विनंती करायची...

जिल्हा प्रशासनाने मनोमन लक्ष घातलं..
पण आपण..?
इथल्या मातीचे भूमिपुत्र..?
स्वप्न दाखवली तरी जोरजोरात टाळ्या वाजवणारे..!
तो समृद्ध इतिहास कोसळू लागेल तेव्हा डोळे उघडतील आपले...
केवळ स्वप्नरंजन...

या लोकांना पैसाच कमवायचा आहे..?
अन् जमवलेल्या सगळ्या नोटा किल्ल्याच्या खंदकात पुरायच्या आहेत...
सगळं राजकारण..
याची कशी जिरवायची,
त्याचा काटा कसा काढायचा...?
हेच तर इथल्या राजकारणाचं सूत्र...!

शहराचा ५३२ वा वाढदिवस येतोय..
सहज मागे वळुन पाहिलं,
फक्तं एकच लक्षात आलं,
भिस्तबाग हळूहळू नामशेष होतोय..
अन् किल्ल्याच्या भिंती कोसळण्याच्या अवस्थेत आल्या आहेत...

- जयंत येलुलकर (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !