'रसिकोत्सव' - अकेले ही निकले थे जाने मंजिल हम, रास्ते में लोग मिल गये, और कारवा बनता गया..

रसिक ग्रुप, अहमदनगरचा विसावा गुढीपाडवा सांस्कृतीक 'रसिकोत्सव'. आम्हीं कृतज्ञ आहोत हजारो रसिक नगरकरांचे... आमचा उत्साह वाढविणाऱ्या सर्वांचे.

2 एप्रिल 2022, गुढीपाडवा रसिक ग्रुपचा रसिकोत्सव. गेली वीस वर्षांची परंपरा जपत या ऐतिहासिक शहराच्या सांस्कृतीक समृध्दीसाठी झटणारा रसिक ग्रुप. या भव्य सांस्कृतीक सोहळ्यासाठी बहुमोल आर्थिक योगदान देणारे सन्माननीय प्रायोजक..

अनेक वर्षांपासून स्नेहाच्या नात्यात गुंफलेल्या सर्व यंत्रणा. जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाचे  मोलाचे सहकार्य. अन् हा सोहळा यशस्वी होण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या  कार्यकर्त्यांची नियत...

तसेच शहरावरील त्यांचे असलेले निस्सीम प्रेम..! आजीपासून नातवंडांपर्यंत सर्वांना आनंद व्हावा. "हे आमचं शहर आहे" याचा इथल्या तरूणाईला अभिमान वाटावा, नगरकर सुखावून जावेत. याच एकमेव प्रामाणिक भावनेतून मोठा होत गेलेला हा सोहळा.!

गेलीं वीस वर्षे सर्वांच्या अथक परिश्रमातून साकार झालेला रसिक ग्रुपचा रसिकोत्सव आता केवळ अहमदनगरमधे नाही तर साऱ्या महाराष्ट्रातील रसिकांच्या परिचयाचा झालाय.. ही या शहराची सांस्कृतिक ओळख बनून गेलीय.

सोहळ्याच्या यशस्वितेसाठी निस्वार्थ भावनेतून रात्रंदिवस कष्ट घेणारे ज्ञात अज्ञात कार्यकर्ते. त्यांच्याविषयी या क्षणी मनापासुन कृतज्ञता. ज्यांनी आमच्यावर विश्र्वास ठेवत अर्थिक सहकार्य केले त्यांना मानाचा मुजरा.

गेल्या वीस वर्षांपासून या रसिकोत्सवामधून जोडले गेलेले विविध क्षेत्रातील आदरणीय प्रमूख मान्यवर पाहूणे, प्रायोजक तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेले हजारो रसिक, यांना मनापासुन वंदन...

प्रिय नगरकर, इतक्या मोठ्या संख्येने तुम्हीं या सोहळ्यास नेहमीप्रमाणे आलात.. तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुललं.. अन् आमच्या कष्टाचं चीज झालं. आपल्या सर्वांचे मनापासुन आभार...!

अकेले ही निकले थे जाने मंजिल हम,
रास्ते में लोग मिल गये, लोग मिलते गये 
कारवा बनता गया, कारवा बन गया !!

दोन वर्षांच्या संदर्भ हरवून बसलेल्या दिवसानंतर प्रचंड उत्साहात, आनंदात साजरा झालेला हा सोहळा त्यांना अर्पण.! जे आमचे खरे हितचिंतक आहेत.

धन्यवाद.

- जयंत येलुलकर (अध्यक्ष, रसिक ग्रुप अहमदनगर)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !