'या' महिला डॉक्टरने पटकावला 'मिसेस मेडिक्वीन महाराष्ट्र स्मार्ट अ‍ॅण्ड ब्युटीफुल' किताब

अनिरुध्द तिडके (अहमदनगर) - नुकतेच झालेल्या 'मेडिक्वीन मेडिको पेजंट मिसेस महाराष्ट्र' स्पर्धेमध्ये येथील डॉक्टर अमृता बर्‍हाटे यांनी 'मिसेस मेडिक्वीन महाराष्ट्र स्मार्ट अ‍ॅण्ड ब्युटीफुल' हा किताब पटकावला. पुण्यातील बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली.

'मेडिक्वीन मेडिको पेजंट'तर्फे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांसाठी सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. मेडिक्वीन ही केवळ एक सौंदर्य स्पर्धा नसून, महिला डॉक्टरांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणून पुढे आले आहे.

डॉ. अमृता बर्‍हाटे यांना सुनेत्राताई पवार, शितल रांका, अभिनेत्री पूजा सावंत, सुशांत शेलार, डॉ. ऊत्कर्ष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे यंदा हे तिसरे पर्व होते.

महाराष्ट्रातील अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, डेंटल, होमिओपॅथी, फिजिओथेरपी क्षेत्रातील दोनशे पेक्षा जास्त महिला डॉक्टर सहभागी झाल्या होत्या. त्यातून ५५ स्पर्धक शेवटच्या फेरीमध्ये पोहोचले. यामधून विविध कॅटगरीतून विजेते ठरविण्यात आले.

अभिनेते समीर धर्माधिकारी, शितल रांका, डॉ. रेवती राणे, डॉ. उज्वला बर्दापूरकर, डॉ. श्रद्धा जावंजल, डॉ. अमोल गिते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. डॉ. बर्‍हाटे यांनी मिळवलेल्या यशबाद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !