उद्धवराव सोनवणे यांना जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार

अहमदनगर - कौठा (ता. नेवासा) येथील राजे संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक उद्धवराव सोनवणे यांना नुकताच जिल्हास्तरीय 'गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने ९ एप्रिल २२ रोजी जिल्हास्तरीय चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळह हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

या सोहळ्यात राज्याचे शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर यांच्या हस्ते उद्धवराव सोनवणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस, उपशिक्षणाधिकारी धनवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा. माणिक विधाते, शिक्षक सोसायटीचे बाबासाहेब बोडखे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, सरचिटणीस बाळासाहेब कळसकर हे उपस्थित होते.

तसेच जिल्हा उपाध्यक्ष मिथुन डोंगरे, निवृत्ती इले, राजेंद्र सोनवणे, भाऊसाहेब रोहकले, बेरड, बाबासाहेब शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्था अध्यक्ष रामदास गोल्हार, अप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, सुनील दानवे, सोपान काळे, रामलाल कर्डिले, राजेंद्र लोहकरे, सावता गायकवाड, श्रीधर मुरकुटे, बाळासाहेब पंडित यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !