सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना 'डिस्चार्ज'

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. चार दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयाने आज त्यांना डिस्चार्ज दिला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना मुंडे यांनी आता प्रकृती चांगली असून माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणारे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक तसेच रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करणारे सर्व पक्षाचे नेते मंडळी व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले आहेत.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच मी पुन्हा पूर्वीसारखा बरा होऊन जनसेवेत दाखल होईल असे ते म्हणाले. दरम्यान, डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे कार्यकर्त्यांनी काही दिवस भेटीसाठी येऊ नये मी स्वतः लवकरात लवकर स्वतः कार्यकर्त्यांना येऊन भेटेल असे आवाहनही त्यांनी केले.

(MBP Live24 - फॉलो करा)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !