अहमदनगर - शहरात फरार आरोपींचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना एक माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई केली असता जिल्ह्यातून २ वर्षे तडीपार केलेल्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.
भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्यीत राहणारा अहमद आब्बास पठाण (रा. कापुरवाडी, ता. जि. अहमदनगर) हा तडीपार आहे. तो मिरावली पहाड़ परिसरात वावरत आहे, अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी वारुळवाडी परिसरातील मिरावली पहाड भागात जावुन त्याचा शोध घेतला.
तो मिरावली पहाडाचे पायथ्याला दिसताच त्याला ताब्यात घेतले. त्याला उपविभागीय दंडाधिकारी (नगर) यांच्या आदेशानुसार दि. २८/२/२०२२ पासुन दोन वर्ष कालावधीसाठी अहमदनगर जिल्ह्याचे बाहेर हद्दपार केलेले आहे.
हा कालावधी अद्याप संपलेला नसूनही तो वारुळवाडी शिवारात मिरावली पहाडाजवळ मिळुन आल्याने त्याला ताब्यात घेतले. दि. ५/४/२०२२ रोजी त्याचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल दिनेश मोरे यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन फिर्याद दिली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, दिनेश मोरे, बापुसाहेब फोलाणे, रविकिरण सोनटक्के, भिमराज खर्से यांनी केली.