अखिल भारतीय छावा संघटनेचा 'हा' सामाजिक उपक्रम प्रेरणादायी

अहमदनगर - अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या ४४ व्या जयंतीनिमित्त बाबावाडी येथे फळाचे वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री काळे, नगरसेविका सोनाली चितळे, छावा महिला जिल्हाअध्यक्ष सुरेखाताई सांगळे, उपस्थित होत्या.

यावेळी शिवराष्ट्र सेनेचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, छावा संघटनेचे युवक आघाडी पश्चिम महाराष्ट्र सचिव दत्ता वामन, अफसर शेख, योगेश खेंडके, आशाताई गायकवाड, ज्ञानेश्वर हडोळे, राजू कवडे, प्रिया गायकवाड आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री काळे म्हणाल्या, जयंतीनिमित्त इतर खर्च न करता त्याला फाटा दिला. अखिल भारतीय छावा संघटनेने सामाजिक उपक्रम म्हणून बाबावाडी येथील विद्यार्थ्यांना फळाचे वाटप करून हा कौतुकास्पद उपक्रम राबवला.

छावा संघटनेचे युवक आघाडी पश्चिम महाराष्ट्र सचिव दत्ता वामन म्हणाले, अण्णासाहेब जावळे यांनी संघटित होऊन वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा कानमंत्र दिला. त्यांचा वारसा व प्रेरणा घेउन त्यांचे कार्य पुढे चालवण्यासाठी संघटना कार्यरत आहे.

ही संघटना वंचितांच्या हक्कासाठी लढा देत आहे. अण्णासाहेब जावळे यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरांमध्ये विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे म्हणाले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !