आजपासून एक कर.. (जागतिक महिला दिन विशेष)

आजपासून एक कर.
गुड मॉर्निंगला तिचा फोटो वापरणे बंद कर.
आजपासून एक कर..
ती काहीतरी वेगळं करतेय तर तिला सपोर्ट कर.

आजपासून पासून एक कर.. 
ती छान राहते ना तर तिची मनापासून तारीफ कर.
आज पासून एक कर..
ती तुझ्या घरात काम करते तिचा आदर कर.

आजपासून एक कर..
तिच्याबद्दल गॉसिपऐवजी तिला समजून घ्यायचा प्रयत्न कर.
आजपासून एक कर..
आहे त्यात समाधान मान, तिची तुलना करणं बंद कर.

आज पासून एक कर..
तिला फक्त शरीर न समजता तिच्या मनावर प्रेम कर.
आज पासून एक कर..
तिला गृहीत धरणं बंद कर. तिला नेमकं काय हवंय हे बघण्याचा प्रयत्न कर.

आजपासून एक कर..
एक दिवस महिला दिन साजरा करण्यापेक्षा रोज व्यक्ती म्हणून तिचा सम्मान कर.

- दिपाली विजय माळी (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !