७ फेब्रुवारी. आज रोज डे.. व्हँलेटाईन सप्ताहाची सुरवात.. गुलाब देऊन प्रेम व्यक्त करायचा दिवस. आपल्या आयुर्वेदात गुलाब खूप वैशिष्ट्ये घेऊन उमलतो बरं का.. व्हिटमिन अ, ब, क, ड बरोबर आर्यनही भरपूर मात्रेत असतं.
रोज सकाळी उठल्याबरोबर देशी गुलाबाच्या दोन पाकळ्या खाल्याने रक्त शुध्द होते. आणि दिवसभर उत्साही वाटते. गुलाब दिन तथा रोज डे व्हेंलटाईन सप्ताहाचा पहिला दिवस. शब्दाविना कांही सांगायचं ते गुलाब देऊन..
कल्पना मोठी मोहक आहे. अर्थात प्रेम व्यक्त करायला गुलाबचं का निवडला.? त्यासोबतचे काटे आयुष्यात येणाऱ्या रात्रींचीही आठवण करुन देत असावेत ना.. काट्यांबरोबर गुलाब असतो. आपली मखमली पाकळ्यांनी बरसात करतो चांदण्याची.
माझ्या साऱ्या सख्यांच्या आयुष्यात गुलाबाचा मादक सुंगध,त्याचा मखमली स्पर्श आणि कार्यभाग संपला की अबोलपणे पाकळ्यांना सोडून द्यायची वृत्ती हे सारं येऊ दे. साऱ्यांच्या आयुष्यात गुलाब सुंगधीत करत येऊ देत...
आमेन....!!!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)