अरे व्वा ! महाराष्ट्र साहित्य परिषद सावेडीच्या 'वारसा' दिवाळी अंकाला 'हा' राज्यस्तरीय पुरस्कार

अनिरुध्द तिडके (अहमदनगर) - साहित्य क्षेत्रात राज्यात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या पुणे येथील यंदाच्या राज्यस्तरीय मराठबोली दिवाळी अंक स्पर्धेमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची सावेडी उपनगर शाखा व शांती कुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने प्रकाशित झालेल्या वारसा दिवाळी अंकास राज्यस्तरीय दुसरे पारितोषिक जाहीर झाले.

नुकतेच पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज सभागृहात झालेल्या शानदार समारंभात संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव भापकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले, असे वारसा दिवाळी अंकाचे संपादक नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले.

अधिक माहिती देताना फिरोदिया म्हणाले की, या स्पर्धेत राज्यातील ३७४ दिवाळी अंकांचा समावेश होता. मोठ्या संख्येने सहभाग असलेल्या या स्पर्धेमध्ये वारसा दिवाळी अंकास द्वितीय पारितोषिक मिळणे ही शाखेसाठी निश्चितच गौरवाची व अभिमानाची बाब आहे.

म.सा.प च्या सावेडी उपनगर शाखेच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून वारसा दिवाळी अंकाची निर्मिती केली जाते. राज्यातील नामवंत साहित्यिकांचे लेख, कविता यांचा अंकात सहभाग असतो.

प्रतिभावान नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे व त्यांच्यातील प्रतिभा साहित्य रसिकांना अनुभवायला मिळावी या हेतूने त्यांच्या साहित्याचा अंकात समावेश असतो.

मराठी भाषेची चळवळ अधिक समृद्ध व्हावी यासाठी सावेडी शाखा नेहमीचं प्रयत्नशील असून कोणताही व्यावसायिक हेतू नसलेल्या वारसा अंकास साहित्य रसिकांकडून नेहमीचं  भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून वारसा दिवाळी अंकास राज्यातील प्रतिष्ठित संस्थांकडून प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यंदा अंकात दर्जेदार साहित्या सोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या बालपणीच्या आठवणींचा खजिना वाचकांना आनंद देणारा आहे.

या दिवाळी अंकाची मांडणी व गुणवत्ता यामुळें अंक संग्राह्य झाला असून अंकाचे राज्यांतील साहित्यिक, रसिक वाचकांकडून खास कौतुक होत आहे. जिल्ह्याच्या साहित्य परंपरेला अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न सावेडी शाखेकडून होत असतो.

यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यात येते. अंकाच्या निर्मितीसाठी शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने मोलाचे आर्थिक योगदान मिळाले आहे.

हा अंक वाचनीय, आकर्षक होण्यासाठी कार्यकारी संपादक जयंत येलुलकर, उपसंपादक प्रा. शशीकांत शिंदे, वैशाली मोहिते, पराग पोतदार तसेच शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले आहेत.

या अंकाची मांडणी आर्टिस्ट किरण गवते यांची असून चित्रे नामवंत रेखाचित्रकार श्रीधर अंभोरे यांची आहेत. छपाई उमेश मंगलारप यांनी केली आहे. या अंकात आपल्या साहित्याचा समावेश असलेले मान्यवर लेखक, कवी, चित्रकार, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित यांच्या विषयी फिरोदिया यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

नामवंत कवी रामदास फुटाणे,ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी व पदाधिकाऱ्यांनी या यशाबद्दल म.सा.प च्या सावेडी शाखेचे अभिनंदन केले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !