नाशिक - येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्यावतीने गेल्या तीन दिवसांपासून घेण्यात आलेल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित, शिक्षकांसाठी "आकर्षक पोस्टर स्पर्धा" व विद्यार्थ्यांसाठीच्या " वक्तृत्व स्पर्धा " आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धांमध्ये विशेष यश मिळवलेल्या यशस्वी संचालकांचा व विद्यार्थ्यांचा विशेष पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. शिंगाडा तलाव येथील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्याध्यक्ष शिवाजीराव कांडेकर हे उपस्थित होते.
यावेळी शिवप्रतिमेला अभिवादन केल्यानंतर,, स्पर्धेत यश मिळविलेल्या ११ शिक्षक व ४ विद्यार्थ्यांना शिवचरित्राची पुस्तके, स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, उपाध्यक्ष अण्णासाहेब नरुटे, अशोक देशपांडे, मुकुंद रनाळकर, अतुल आचलिया, लोकेश पारख, रविंद्र पाटील, कैलास देसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या शिक्षकांचा सन्मान - किरण सानप, निलेश दूसे, पवन जोशी, अर्जुन शिंदे, सचिन अपसुंदे, गणेश कोतकर, प्रतिभा देवरे, सोमनाथ पगार, घनश्याम अहिरे, कल्पेश जेजुरकर. या विद्यार्थ्यांचा सन्मान - वक्तृत्व स्पर्धेतील विशेष यश मिळवलेल्या कस्तुरी हांडे, प्राची राजगुरू, हेमंत चव्हाण, गायत्री दूसे या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.