नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) खातेदारांसाठी अलर्ट जारी केला आहे. बँकेने आपल्या ४० कोटी खातेदारांना मुदतीपूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा सल्ला दिला आहे.
बँकेने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून वेळोवेळी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. जेणेकरून खातेधारकांना कोणतीही अडचण येऊ नये. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सर्व बँक खातेधारकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे.
बँकेने आपल्या खातेदारांना ३१ मार्च २०२२ पर्यंत त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा सल्ला दिला आहे. पॅनला आधारशी लिंक करणे अनिवार्य असल्याचे बँकेने म्हटले आहे.
परंतु पॅन कार्ड आधार सोबत लिंक करण्यात अयशस्वी झाल्यास बँकिंग सुविधांच्या वापरामध्ये समस्या उद्भवू शकतात. बँकिंग सेवेत खंड पडू नये, त्यामुळे हे काम मुदतीपूर्वी होणे गरजेचे आहे, असे बँकेने म्हटले आहे.
आता आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगणात आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा पॅन घरबसल्या आधारशी लिंक करू शकाल. कोणत्याही अडचणीत न आलेले बरे, त्यामुळे हे काम काही मिनिटांत घरी बसून उरकून घेतलेले बरे.
तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकता. यासाठी सर्वप्रथम आयकर खात्याची वेबसाइट https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जा.
लॉगिन केल्यानंतर, होमपेजच्या डाव्या बाजूला, आधार लिंक या पर्यायावर. नवीन पृष्ठ उघडल्यानंतर, पॅन कार्ड क्रमांक आणि तुमचा आधार कार्ड क्रमांक भरा आणि आधारवर प्रविष्ट केलेले नाव आणि मोबाइल क्रमांक भरा.
यानंतर सर्व तपशील काळजीपूर्वक वाचा आणि आधार लिंकचा पर्याय निवडून सबमिट करा. दि. ३१ जानेवारीपर्यंत, ४५ कोटीपेक्षा जास्त पॅन कार्डधारकांनी त्यांचे पॅन आणि आधार लिंक केले आहे, परंतु अजूनही अनेक लोकांना लिंक करण्यात समस्या येत आहेत.
तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डमध्ये टाकलेली माहिती जुळत नसेल, तर ती लिंक करताना तुम्हाला त्रास होईल. पॅन आणि आधारवर टाकलेले नाव, जन्म तारीख, वर्ष, ओटीपी मिळवण्यासाठीचा मोबाइल नंबर इत्यादी तपशील दोन्ही कागदपत्रांमध्ये भिन्न असल्यास, तुम्हाला लिंक करताना त्रास होईल.
अशा परिस्थितीत, तुम्हाला आयकर वेबसाइट आणि कार्यालयात भेट देऊन पॅन कार्डवर प्रविष्ट केलेली माहिती दुरुस्त करावी लागेल, पॅन कार्डमध्ये चूक असल्यास, किंवा UIDAI वेबसाइटला भेट देऊन तुम्हाला ही चूक सुधारावी लागेल. तेव्हा त्वरा करा, आणि आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करा.