प्रॉमिस डे - हवे असतात का नाती जपण्यासाठी वचनांचे चौघडे..?

वचन. ना मात्रा, ना वेलांटी, ना काना.. पण कित्ती खोल आहे ना अर्थ.. एक फार जुणं आणि सुरेख गाणं आहे.. 'स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला.. गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला..' किती सुंदर कल्पना आहे.

गतजन्मातील वचनांच्या आठवणी करुन देणारा तो.. वचनांच्या आठवणी करुन द्याव्या लागतात. का.? गतजन्मीच्या वचनांचे राहू दे हो.. पण या जन्मातील वचनांची तरी आठवण तरी असू द्यावी ना.. मैत्रीचं नातं त्यातील वचन होतात का पूर्ण.?

वचन दे म्हटल्यावर मनावर 
उमटतो का किचिंतसे ओरखडे ?
हवे असतात का नाती जपण्यासाठी 
वचनांचे चौघडे ?

राजकारण्यांचे वचननामे नसतात हं कधी पूर्ण करण्यासाठी.. लग्नाआधी दिलेले चंद्र तारे तोडण्याचे वचन नंतर पाळलेय का तुम्ही.? अशी वचनात बांधतो आपण नाती पण असतात का ती आपली ?

मनाने मानलच नाही नातं, तर त्या सप्तपदीच्या सात वचनांना काही अर्थ असतो का.? तुम्ही म्हणाल आज स्वप्नजाने विचारलेत खूप खूप प्रश्न. पण विचारलत स्वतःला तर मिळतील साऱ्या प्रश्नांचे अर्थ.!

Happy promise day friends

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !