अबब ! आंब्याच्या पहिल्या पेटीचा पुण्यात लिलाव, किंमत ऐकून व्हाल हैराण..

पुणे - 'फळांचा राजा' म्हणून ओळखला जाणाऱ्या आंब्याचा हंगाम जवळ आला आहे. तत्पूर्वी आंब्याचे दरही प्रचंड महागले आहेत. आंब्याच्या हंगामापूर्वी आंब्याची पहिली टोपली पुण्यात, महाराष्ट्रात दाखल झाली.

छायाचित्र सौजन्य - ANI वृत्तसंस्था

यानंतर आंब्याचा लिलाव झाला असून त्यात आंब्याची पहिली पेटी ३१ हजार रुपयांना विकली गेली आहे. देवगड रत्नागिरीचा हापूस आंबा जगभर प्रसिद्ध मानला जातो. शुक्रवारी पुण्यातील एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याचे पहिले पीक पोहोचले.

या आंब्याच्या पेटीसाठी खरेदीदारांमध्ये स्पर्धा लागली होती. दरम्यान, विक्रेत्याने आंब्याच्या या पहिल्या पेटीचा लिलाव केला. लिलावाच्या सुरुवातीला पेटीची किंमत ५ हजार रुपये ठेवली होती.

मात्र शेवटी आंब्याची एक टोपली ३१ हजार रुपयांना विकली गेल्याचे सांगण्यात येत आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, व्यापारी युवराज काची यांनी सांगितले की, हे हंगामातील सुरुवातीचे आंबे आहेत.

दरवर्षी या लवकर आंब्याचा लिलाव परंपरा म्हणून केला जातो. कारण त्यातून पुढील दोन महिन्यांचे व्यवसायाचे भवितव्य ठरते. यावेळचा लिलाव ५० वर्षांतील सर्वात महागडा ठरल्याचे सांगितले जात आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !