अनिरुध्द तिडके (मनोरंजन विश्व) - सिनेसृष्टी मधील ख्यातनाम दिगदर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ‘नाय वरण-भात लोणचा, कोण नाय कोणच्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांच्या अंगलट येणार, अशी चिन्हे दिसून येत आहेत.
महेश मांजरेकर मराठी चित्रपट सृष्टी मधील हे असे एक नाव आहे की, जे नेहमीच चर्चेत असते. महेश मांजरेकर यांनी नुकतीच कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात केली आहे. कॅन्सरसारख्या आजारातून देखील ते मुक्त झाले आहेत. मात्र, त्यांची प्रकृती खालावलेली दिसत आहे. अशातच त्यांच्यापुढील अडचणी आणखी वाढणार आहेत.‘नाय वरण-भात लोणचा कोण नाय कोणच्या’ हा चित्रपट मुंबईतील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी या चित्रपटामध्ये अनेक भडक दृश्य चिञीच करण्यात आलेले आहेत. लहान मुलांचे वयस्कर महिलांशी संबंध दाखवण्यात आलेले आहेत.
थेट पाॅस्को न्यायालयात तक्रार - आता महेश मांजरेकर यांच्या विरोधात सीमा देशपांडे या महिला कार्यकर्तीने थेट पाॅस्को न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या आधी देखील त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. मात्र, त्यांची दखल कोणी घेतली नव्हती. त्यांनी आता न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने देखील या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.
त्यामुळे महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांना अटक होऊ शकेल का? नाही याबाबत आत्ताच तर्कवितर्क लावणे ठीक नाही, असे देखील वकिलांनी सांगितले. मात्र एकूणच या चित्रपटामुळे ते खूपच चर्चेत आले आहेत. तसेच हा चित्रपटही वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.