प्रेम. मनात निर्माण झालेली हळुवार भावना..!
निर्मळ, प्रांजळ गहिरेपण..
प्रेमळ असणारी अस्सल असतात..
ती प्रेम करतात..
तिथे सहजता असतें..
ती व्याकूळ असतात. प्रेमाची..
तिथे साद हवी असते..
पावा. मधुर असतो..
स्वर. तल्लीन करतो..
हात पाय हलवत जवळ घे म्हणत इवल्याश्या डोळ्यांनी हसत पाहणारं बाळ..
वासराच्या गळ्यातील घंटीचा नाद..
सिग्नलच्या खांबावर टेकत घामानं सुकलेल्या सोनेरी केसांचा खायला मागणारा छोटा मुलगा..
घरातला लाडका कुत्रा मांडीवर डोके ठेवून निवांत पडताना हळुच शेपूट हलवत डोळे मिटून...
आईचं आपल्या तापलेल्या बाळाला कडेवर घेऊन डॉक्टरकडे जाणे..
गुरुजींनी कधी डोक्यावरून हात फिरवला तेव्हा..
लग्न मंडपातून सासरी निघणारी बहीण..
अल्लड, अवखळ बालपण..
शाळा..
वर्गातल्या मुली..
त्यात दिसणारी ती...
वहीचं शेवटचं पान..
खाडाखोड...
दडलेलं असतं कधी कधी इथेही व्हॅलेंटाईन...
- जयंत येलुलकर (अहमदनगर)