लतादीदींच्या निधनाने देश शोक सागरात बुडाला, पण 'ही' माणसे मात्र..

'भारतरत्न लतादीदी'आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे स्वर अमर आहेत.. दीदी आपल्यात होत्या.. आता नाहीत आपला देश या दोन भागात विभागला गेलाय. देश हळहळला.. जगाने शोक व्यक्त केला..

लतादीदी. आपल्या देशाचा स्वर होता. आपली गरिमा होती. सारेच अस्वस्थ, शोकमग्न. दीदी अनंतात विलीन झाल्या.. अग्नी शांत झाला नाही तोच, शाहरुखने वाहिलेली श्रद्धांजली, मनोभावे केलेलीं प्रार्थना.. यावर उगीचच लोकांमधे विषारी विखार पसरविण्याचा प्रकार..

दीदींच्या स्मारकाचं तत्क्षणी सुरु झालेलं राजकारण.. हे आले होते.. ते कुठे गायब होते.. त्यांनी पायरी चढून दर्शन तरी घ्यायला हवे होते.. ते लांब उभे होते.. अशा कितीतरी टिपण्या.. मेसेज...

आपल्यापेक्षा दीदींच्या सहवासात असलेली ही सारी माणसे. ज्यांचे मंगेशकर घराण्याशी वर्षानुवर्षे कौटुंबीक संबंध आहेत. नातं आहे, जिव्हाळा आहे...

दीदींच्या निधनाच्या वृत्ताने सारा देश शोकसागरात बुडला असताना, काही माणसे यालाही वेगळ्या भावनेने आपल्या पद्धतीने जोडून समाजात वेगळा क्लेश निर्माण कसा करू शकतात हीच शोकांतिका आहे.

हे सगळ पद्धतशीरपणे व्हायरल करीत होते. जाणीवपूर्वक.. मी तर म्हणेन ही विकृती आहे. समाज जीवनात वावरताना निरपेक्ष भावना अंगी असायला हवी. 

परिस्थितीचा विचार न करता कलुषित विचारांनी, डोळ्यांनी जर आपण जगाकडे पहायला लागलो तर समाजामध्ये उरलेली निर्मळ, प्रांजळ भावना अस्तास चालली आहे की काय असे वाटून जावे.

कोणत्याही प्रसंगाशी जर आपण आपल्या पद्धतीने त्याची राजकारणाशी, धर्माशी सांगड घालत हळूच चुकीचं काही पसरवू लागलो तर आपण नेमके कुठे नेणार आहोत, आपल्या देशाला लाभलेल्या उच्च संस्कृतीला, आपल्या परंपरेला..

इतकी भावनाशून्य नाहीच आपल्या महान परंपरा लाभलेल्या देशाची विचारसरणी.. एवढे उधळलेलो नाहीत आपण.. निदान इथेतरी..

- जयंत येलुलकर (अहमदनगर)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !