ठरलं ! मला आता फक्त 'माझ्या'सोबत रहायचंय..

आता असंही वाटू लागलं,
जगण्याच्या या साऱ्या फेऱ्यांमधून बाहेर पडावं..
मी माझ्याशीच मैत्री करावी...
कितीतरी वर्षात बोललो नाही माझ्याशी मनसोक्त..



खरंच,
नको वाटायला लागलं हे सारं..
ठरवायचं...!
मी मलाच घेऊन भटकणार आहे..
रणरणत्या उन्हानं तापलेल्या तापलेल्या मातीवरून..

कधी पाऊस अंगावर घेत..
तूषारांनी आकाशी सौंदर्य निर्माण करणाऱ्या इंद्रधनुला आवाज देतं...
माझ्याशी बोलत बोलत उंच डोंगरावर जायचं..
क्षितिजाला हाक द्यायची..


खळखळून हसायचं.
कितीतरी दिवस दाबून ठेवलेलं एकदाचं रडून घ्यायचं.
खूप छळलं...
कधी ऐकल नाही त्याचं.
वेदना झाल्या असतील कितीतरी..
लक्ष ही गेलं नाही कधी.

पण बोलला नाही मला..
जाणवू दिलं नाही..
निमूट सोबत करायचा...
क्षमा मागायाची आता त्याची..
मिठीत घ्यायचं त्याला...

जग आता तुला कसं जगायचं..
मोकळे करायचे सारे दोर..
मीच येईन तूझ्या मागे मागे...
घेऊन चल हवा तसा.
मला आता माझ्यासोबत रहायचंय...!

- जयंत येलुलकर (अहमदनगर)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !