आलिंगन म्हटलं की यशोदेच्या मिठीतला कान्हा आठवतो... आजोबांच्या मिठीत पहुडलेला चिमुकला आठवतो... मिठी किती मिठी (गोड) असते ह्याचं सुख अनुभवानच मिळतं.
शाळेच्या दारात चिमुकलीला आणायला रोज रोज आईच जाते पण कधीतरी बाबा आलेला पाहून ती चिमुकली घट्ट मिठी मारते ना.. ते अनुभवताना बाबांला वाटतं जगातील स्वर्गसुख म्हणजे हेच...!
शब्दांविणा सारे जाहले...तुझ्या मिठीत मी आश्वस्त जाहले...दमलेल्या पाठीवर तुझी बस जराही उमटली दोन अक्षरे.!कसं सांगू किती मी सुखावले..बळ येतं हत्तीचं श्रमण्यासाठीमिठीत जेव्हा तुझ्या विसावले.!
असं प्रत्येक स्त्रीमन मनोमन म्हणत असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात असं जाणतं माणूस हवंच. तिने पाठीवर ठेवलेला उबदार हात ती आश्वासक मिठी.!
या मिठीत तुमचे ताणतणाव विरघळून जायला हवीत. होय ना. 'मुन्नाभाई' मधील संजय दत्तने ती सफाई कर्मचाऱ्याला दिलेली एक मिठी अक्षरशः त्या वृध्दाचे मन जिंकून गेली. होतीच जणू ती 'जादूची झप्पी'. ही 'जादूची झप्पी' माणसां - माणसांतील दरी मिटवणारी आहे ना..!
कोरोना काळात माणसं माणसांपासून लांब गेली खरी, पण माणुसकीच्या झप्पीने आपण कित्ती जवळ आलो आहोत.! या 'जादूच्या झप्पी'ला मनात असंच जपूया कायमसाठी.. होय ना.?
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)