'चॉकलेट डे' - प्रेम व्यक्त करण्यासोबत 'हे' सुद्धा आहेत चॉकलेटचे फायदे

लहान असताना 'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला'.. हे गाणं ऐकताना मन खरचं त्या चॉकलेटच्या घराची कल्पना करायला लागत असे... आणि किती चॉकलेट दिली तरी मनाचं समाधान होत नसे.

'फाईव्ह स्टार' खूपच आवडतं चॉकलेट. रावळगांव म्हणजे मला वाटायचं वाढदिवसाला वाटायचचं चॉकलेट असतं..!

मंडळी चॉकलेटचा उगम म्हणे इ. स. पूर्व ११०० मध्ये आहे. असा इतिहासात उल्लेख आढळतो. युरोपमध्ये ७ जुलै १५५० मध्ये पहिल्यांदा चॉकलेट आले. म्हणून जागतिक चॉकलेट दिवस ७ जुलैला साजरा होतो.

चॉकलेट थियोब्रोमा कॅको या झाडापासून बनवतात. हे बियाणं चॉकलेटमध्ये फार पूर्वीपासून वापरतात. अर्थात यात दूध, साखर इ. पदार्थ घातले जातात.

चॉकलेट आवडणाऱ्या लोकांना एक चांगली बातमी. डार्क चॉकलेट अँटीआँक्सिडेंटचा एक शक्तीशाली स्त्रोत आहे. तसेच यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास, रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत होते.

आणि म्हणे सुरकुत्या कमी होतात. मन शांत होतं. चला आपणही खाऊ रोज एक चॉकलेट..! मंडळी. दररोज एक अब्ज लोक चॉकलेट खातात हं.. तुम्हांला जे आवडतात त्यांना द्या चॉकलेट आणि घ्या चॉकलेट..!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !