विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाचा 'हा' उपाय, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई - राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महानगरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एक अभियान हाती घेतले आहे.


‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. मंत्री गायकवाड म्हणाल्या, राज्यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या होत्या.

परंतु कोरोनाचा पुन्हा एकदा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. इयत्ता दहावी, बारावीसह सर्वच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा साधारणतः मार्च महिन्यात सुरू होतात.

हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरू राहिले पाहिजे, या धोरणानुसार ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले.

सद्यस्थिती लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी योग्य ती कार्यवाही करावी व ऑनलाईन शाळांची संख्या, उपस्थित विद्यार्थी, अनुपस्थित विद्यार्थी संख्या याची माहिती दररोज शासनास सादर करावी

असे निर्देश गायकवाड यांनी शालेय शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. राज्यातील इतर शहरांमध्येही यााच पद्धतीने शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी सांगितले आहे. परंतु, अनेकांनी शाळा कॉलेजेस बंद ठेवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !