शेवगाव - तालुक्यातील नरेंद्रनगर (दहिगावने) येथील श्रीराम सेना मंडळाच्या युवक व ग्रामस्थांनी नुकतेच पंचायत समिती सभापती क्षितिज घुले पाटील यांचा सत्कार करून आभार मानले आहेत.
या युवकांनी काही दिवसांपूर्वी गावातील हनुमान मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी व बसण्यासाठी बाकड्यांची मागणी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीची सभापती यांनी तत्काळ दखल घेतली.
नुकतेच त्यांनी बाकडे प्रदान केले. तसेच त्यांच्या हस्ते मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन संपन्न झाले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांनी सभापती डॉ. क्षितिज नरेंद्र घुले आभार मानले आहेत.
यावेळी सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, सुरेश घनमोडे, रमेश जाधव, संतोष घुले, मेजर श्याम कर्डीले, मच्छिंद्र भूमकर, मंगेश कुलकर्णी व श्रीराम सेनेचे सर्व युवक उपस्थित होते. या सर्वांनी सभापती घुले यांचे आभार मानले.