अहमदनगर - टपाल जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणूक केली जाणाार आहे. श्रीरामपूर विभागाचे डाकघर अधीक्षक यांच्यातर्फे थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. यासाठी पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत.
शैक्षणिक पात्रता दहावी पास, वय मर्यादा वय १८ ते ५०, कोणत्याही कंपनीचे माजी विमा सल्लागार प्रतिनिधी, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, माजी सैनिक, बेरोजगार, स्वयंरोजगार असणारे तरुण, तरुणी, निवृत्त शिक्षक, स्वयंसहाय्यता ग्रुप सदस्य्, ग्रामपंचायत सदस्य किंवा वरील पात्रता असणारे इच्छुक उमेदवार मुलाखतीस पात्र आहेत.
इच्छुक उमेदवारांना विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती असणे अपेक्षित आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पाच हजार रुपयाची रक्कम राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्रमध्ये तारण म्हणून ठेवावे लागतील. परीक्षा फी ४०० रू. आणि परवाना फी ५० रुपये डाक विभागात जमा करावे लागतील.
थेट विमा प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे कमिशन किंवा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना अधीक्षक डाकघर, श्रीरामपूर विभाग, श्रीरामपूर यांचे नावे केलेल्या लेखी अर्जासोबत यावे.
तसेच येताना सोबत शैक्षणिक पात्रतेची आवश्यक कागदपत्रे, पॅन कार्ड, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, फोटो इत्यादी सह पुढे दिलेल्या ठिकाणी व त्यासमोर दर्शविलेल्या तारखेस उपस्थित रहावे.
संगमनेर पोस्ट ऑफिस येथे सोमवार, 17 जानेवारी 2022, सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत. कोपरगाव पोस्ट ऑफिस येथे मंगळवार, 18 जानेवारी,2022 सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आणि श्रीरामपूर पोस्ट ऑफिस येथे बुधवार, 19 जानेवारी, 2022 सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यत उपस्थित रहावे.