अरे व्वा ! तोफखाना पोलिसांनी 'या' महिलांना दिले अनोखे 'सरप्राईज'

अहमदनगर - तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सावेडी परिसरातील महिलांना रविवारी एक अनोखे सरप्राईज मिळाले. या महिलांनीच काही तास पोलिस ठाण्याचा कारभार आपल्या हाती घेतला. प्रत्यक्ष कामकाज कसे चालते, याचा अनुभव त्यांनी घेतला.

राज्यभरात दि. २ जानेवारीपासून पोलिस स्थापना दिन साजरा होत आहे. यानिमित्त रविवार, दि. २ जानेवारी रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला. सावेडी परिसरातील महिलांना पोलिस ठाण्याची सूत्रे प्रदान करण्यात आली. त्यांना पोलिसांचे कामकाज अनुभवता आले.

पोलिस मित्र असलेल्या महिलांना पोलिस स्टेशनमध्ये कामकाज कसे चालते, याचा अनुभव मिळाला. पोलिस स्टेशनमध्ये एक दिवस पोलिस अधिकारी यांच्या खुर्चीत बसुन काम करण्याची संधी मिळाली. तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या पुढाकाराने ही संधी देण्यात आली.

एरवी पोलिस स्टेशनमधे जाण्यास घाबरणाऱ्या महिलांना पोलिस स्थापना दिनानिमित्त पोलिस स्टेशनमधे पोलिस बनून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या पोलिस मित्र महिला खुप आनंदी झाल्या. पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी महिलांना कामकाजात सहकार्य केले.

यावेळी तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलिस उपनिरिक्षक समाधान सोळंके, कर्मचारी मरकड, विद्या मोरे, यांच्यासह पोलिस मित्र सिमा परदेशी, जयश्री सवासे, शुभांगी कांदेकर, आदी महिला उपस्थित होत्या. त्यांनी पोलिस दलाचे आभार मानले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !