वेदनेच्या अंधारातही, ती उजेडाचं गाणं गात रहाते..

बाई, आतून सतत तुटत असते,
जगण्याच्या सावळ्या गोंधळात
दुसऱ्यांसाठी जगत असते...
मोडते, रडते, पडते पण तरते


थाटात मांडावं असं काहीच 
नसतं तिच्याकडे....
पण वेदनेच्या अंधारातही
ती उजेडाचं गाणं गात रहाते
सुखांशी सख्य नसलं
म्हणून काय झालं ?

कळवळत, तुटत सोपान
चढत रहाते....
काही न मिळूनही
मिळविण्यासाठी..!!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !