मुंबई - कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होत असलेली लक्षणीय वाढ पाहता राज्य शासनाने रविवारी मध्यरात्रीपासून 'नाईट कर्फ्यु'ची घोषणा केली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेमध्ये पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. रोहित शाळा-कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.
खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केली आहे. कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम" करू द्यावे. पूर्ण लसीकरण केलेल्या कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात उपस्थित राहता येईल तर इतरांना लवकरात लवकर लस घेण्यास सांगितले आहे.
अनिश्चित वेळेमध्ये कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतःचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. यामध्ये खाजगी कार्यालयांनी महिला कर्मचार्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे याबाबत सक्त आदेश दिले आहेत.
प्रत्येक कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या तपासणीसाठी 'थर्मल स्कॅनर' आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. शाळा आणि कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
लग्न समारंभसाठी फक्त ५० लोकांना उपस्थित राहता येणार आहे. सामाजिक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांना देखील केवळ ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे.
राज्यातील सर्व स्विमिंग पूल, स्पा आणि जीम पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आहे. चित्रपटगृह रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु राहू शकतील. मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळं पूर्णपणे बंद असतील. सलून व खाजगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
राज्यात सर्वत्र सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी लागू असणार आहे. जलतरण तलाव, व्यायामशाळा, स्पा पूर्णपणे बंद असतील. उपाहारगृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. कोविड लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येईल.