साऊथचा सिनेस्टार यश याचा दमदार अभिनय असलेल्याा 'केजीएफ' (KGF) सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. तुफान ऍक्शन, इमोशनल ड्रामा आणि प्रेेक्षकांनी अफाट पसंतीला उतरलेले डायलॉग्ज, यामुळे केजीएफने तुफान कमाई केली. तेव्हापासून या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची सर्वांना उत्सुकता होती.
ही उत्सुकता आता संपुष्टात आली आहे. कारण आता केजीएफच्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शित होण्याची अधिकृत तारीख जाहीर झाली आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी याची जाहीर घोषणा केली आहे. त्यामुळे यशच्या ऍक्शनचे आणि केजीएफचे दिवाने पुन्हा एकदा त्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
दि. १४ एप्रिल २०२२ रोजी केजीएफचा दुसरा चाप्टर (सिनेमाचा दुसरा भाग) प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाने विविध भाषांमध्ये प्रदर्शित होताच सिनेमागृहांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. अगदी बॉलीवूड सिनेमेही डब्यात गेले होते. परंतु, प्रशांत नील दिग्दर्शित 'केजीएफ'ने बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घातला.
या सिनेमाात यशने 'रॉकी' नावाच्या डॅशिंग युवकाची भूमिका साकारली. रॉकी हा एक तरुण, त्याच्या मरणासन्न आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी शक्ती आणि संपत्ती शोधतो. त्याचा शोध त्याला मुंबईला घेऊन जातो, जिथे तो कुख्यात माफियांना जाऊन भिडतो. त्याचा उयदास्त पहिल्या सिनेमात दाखवला होता.
केजीएफच्या पहिल्या भागाचे बजेट ८० कोटी होते. प्रत्यक्षा या सिनेमाने तब्बल १८७ कोटी रुपये गल्ला जमवला. सर्वार्थाने हा सिनेमा हिट ठरला. सिनेमाच्या पहिल्या भागात कलाकारांचे डायलॉग, बॅकग्राऊंड म्युझिक आणि दमदार अभिनय, हे या सिनेमाचे बलस्थान ठरले. म्हणून रसिक यशच्या प्रेमात पडले.
केजीएफ सिनेमातील गाजलेले संवाद -
- क्या चाहिये रे तुझे ? - दुनिया.
- अगर तुम्हारे में हिम्मत है, तो हजार लोग तुम्हारे पीछे खड़े हैं, तो तुम सिर्फ जंग जीतोगे। मगर हजार लोगों ने हिम्मत जुटा ली कि तुम सामने खड़े हो तो तुम पूरी दुनिया जीत लोगे
- लड़ाई में कौन पहले मरता है इससे कोई फर्क नहीं पड़ता, फर्क इससे पड़ता है कि पहले कौन नीचे गिरा..
- मौत को देखा पैरों की धूल की तरह, तकदीर को ठुकराने वाले सुल्तान की तरह, चिंगारे पैर से दबाके धार-दार खंजर पर चलके... दिल में जो डर उठा उसे मारके... जिगर वालों की फौज बनाकर दुश्मन पर छा गया, काल का करने विनाश महाकाल आ गया
- ट्रिगर पर अंगुली रखने वाला हर शख्स शूटर नहीं होता.. लड़की पर हाथ डालनेवाला हर कोई मर्द नहीं होता.. और आपुन की औकात अपने चाहने वालों के अलावा कोई समझ नहीं सकता
- इस दुनिया में सबसे बड़ा योद्धा मां होती है (या डायलॉगच्या वेळी तर प्रेक्षक टाळ्या-शिट्ट्यांनी थिएटर डोक्यावर घ्यायचे)
मध्यंतरी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व थिएटर्स बंद होती. या काळात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मने कसर भरून काढली. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील रसिकांनी केजीएफचा पहिला भाग अनेकदा पाहिलाय. आता त्यांना उत्सुकता होती ती दुसऱ्या भागाची.
केजीएफ सिनेमाचा पहिला भाग संपतो तेथेच प्रेक्षकांच्या मनात मोठी उत्सुकता निर्माण होते. दुसऱ्या भागात कााय होणार, ही प्रेक्षकांची उत्सुकता तब्बल तीन वर्षे ५ महिने ताणली गेली. मध्यंतरी कोरोनामुळे सिनेमाचे चित्रीकरण आणि प्रदर्शन लांबणीवर पडत गेलेे. पण १४ एप्रिल रोजी दुसरा भाग सिनेमागृहात दाखल होत आहे.
केजीएफचा दुसऱ्या भागाचा टीजर रिलीज होऊन फक्त काही दिवस उलटले आहेत. मात्र, या टीजरलाही प्रेक्षकांनी अफाट प्रतिसाद दिला आहे. सोशल मिडियावर सध्या हाच टीजर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत २३५ लाखांहून अधिक लोकांनी हा टीजर पाहिलेला आहे. आणि वेगाने तो शेअरही केला जात आहे.