अहमदनगर - कै. काकासाहेब म्हस्के मेमोरियल फौंडेशनचे, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथीक कॉलेजच्या विद्यमानाने मुकुंदनगर येथे मोफत सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या मोफत सर्व रोग निदान होमिओपॅथीक उपचार शिबीराचे आयोजन प्राचार्य प्रा. डॉ. निलिमा भोज यांनी जेएन मल्टी स्पेशालिटी होमिओपॅथिक क्लिनिक मुकुंदनगर येथे केले.
या शिबिरामध्ये डॉ. अबोली कुलकर्णी, डॉ. शिल्पा देसाई, रेवणनाथ गिते यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलचे इंटन्स रुनुशा रोयोला, सुन्नत अली अन्सारी, रविना कदम, अमर ढेपे, शब्बू शेख, आदींनी रुग्नांची तपासनी करून रुग्नांना मोफत औषोधोपचार केले.
सकाळी १० ते २ या वेळेत शिबिराच्या माध्यमातून स्त्रीयांचे आजार अनियमित पाळीच्या तक्रारी तसेच कमी जास्त रक्तस्त्राव, पांढऱ्या पाण्याचे आजार लहान मुलांचे आजार पुरुषांचे व वृद्धापकाळातील आजारांवर मोफत होमिओपॅथीक औषोधोपचार केले गेले.
या शिबिरात रुग्नांचे समाधानकारक निदान करण्यात आले. या शिबिराचा सर्व वयोगटातील रुग्नांनी लाभ घेतला. यावेळी अनेक गरीब गरजू मुकुंदनगरांनी चांगला प्रतिसाद दिला. दुपारी दोन वाजल्यानंतर शिबिराचा समारोप करण्यात आला.