अहमदनगर - गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ७९५ बाधित रुग्ण आढळले होते. तर शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ५१० कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कोरोनाची लक्षणे दिसताक्षणीच नजिकच्या सरकारी रुग्णालयात आपली आरटीपीसीआर चाचणी करावी, तसेच ज्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेले नाही, त्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शनिवारी दिवसभरात नव्या ५१० बाधितांची रुग्ण संख्येत भर पडली आहे. तर १७० रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.08 टक्के आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 461 इतकी झाली आहे.
शनिवारी मनपा हद्दीत १८२, अकोले २२, जामखेड ८, कोपरगाव १९, नगर ग्रामिण ३१, नेवासा ५, पारनेर १२, पाथर्डी १७, राहाता ६३, राहुरी १९, संगमनेर ७, शेवगाव २०, श्रीगोंदा ९, श्रीरामपूर ३२, कॅन्टो्नमेंट बोर्ड १६, मिलिटरी हॉस्पिटल २६, इतर जिल्हा १२ आणि इतर राज्य २ बाधित रुग्ण आढळले आहेत.
यापैकी नगर शहर महापालिका हद्दीत १८२, मिलिटरी हॉस्पिटलमध्ये २६ आणि भिंगारमध्ये १६ बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शनिवारी सर्वाधिक २२२ रुग्ण नगर शहराच्या व उपनगराच्या हद्दीत आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र पूर्ववत सुरू करण्यात आली आहेत.