नवी दिल्ली - भारतात गेल्या २४ तासात दीड लाखांहून अधिक कोविडबाधित रुग्णसंख्या आढळली आहे. तर ३ हजार ६२३ ओमिक्रॉन बधितांची संख्या आढळून आली आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक बाधित रुग्ण आहेत.
हे प्रमाण चिंताजनक असल्याने ठिकठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात रविवारी मध्यरात्रीपासून 'नाईट कर्फ्यु' घोषित करण्यात आलेला आहे
देशातील कोविड बाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ५५ लाख ३८ हजार ४ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराची एकूण ३,६२३ प्रकरणे नोंदली आहेत. बरे झालेल्यांची संख्या १,४०९ आहे.
भारतात गेल्या २४ तासांत १ लाख ५९ हजार ६३२ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे देशातील दैनंदिन दर १०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रविवारी सांगितले आहे.
ओमायक्रॉनची सर्वाधिक बाधित रुग्णसंख्या महाराष्ट्रात आढळून आलेली आहे. महाराष्ट्रात १ हजार ९ बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर दिल्ली (५१३) आणि कर्नाटकमध्ये (४४१) ओमायक्रोन बाधित रुग्ण आढळले आहेत.