नवी दिल्ली - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या आणि ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या वाढत्या संसर्गावर उपाय सापडला आहे. ज्यांनी कोवॅक्सिन लस घेतली आहे, त्यांना याच लसीचा बुस्टर डोस प्रभावी ठरणार आहे. हा तिसरा डोस ओमाक्रॉन आणि डेल्टा व्हेरिअंटला टक्कर देईल, असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे.
या लसीचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेकने इमोरी यूनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका अभ्यासाच्या आधारावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, नमुन्यांचा अभ्यास केला असता ही माहिती समाेर आली आहे. बुस्टर डोसमुळे सर्वच नमुन्यांमधून डेल्टा काढून टाकला.
ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्ये हा आकडा नव्वद टक्के होता. त्यामुळे ही माहिती हेच दर्शवते की सतत बदलणाऱ्या महामारीत कोव्हॅक्सिन हा एक प्रभावी पर्याय ठरणार आहे. या अभ्यासात लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस दिल्यानंतर सहा महिन्यानंतर बूस्टर डोस दिलेला होता.
असिस्टेंट प्रोफेसर मेहुल सुथार म्हणाले, ज्या लोकांना कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस दिलेला होता. त्यांच्यामध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन या दोन्ही व्हेरिअंटच्या विरोधात प्रभावी प्रतिकार शक्ती विकसित झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आजाराची दाहकता कमी होतेच, शिवाय दवाखान्यात दाखल होण्याची शक्यता कमी आहे.
भारत बायोटेक कंपनीचे अध्यक्ष डॉ. कृष्णा एल्ला म्हणाले की, आमची कंपनी सातत्याने कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनाला लागलेली आहे. तसेच सलग नवीन प्रयोग केले जात आहेत. शिवाय कोरोनाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय वॅक्सिन तयार करण्याचे लक्ष्य देखील पूर्ण झाले आहे.