शेवगाव - वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था, शेवगाव या महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र प्राप्त संस्थेच्या अध्यक्षपदी बालमटाकळीचे सुपुत्र भाऊसाहेब भाकरे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
उपाध्यक्षपदी नवनाथ कचरु पोटफोडे तर मानद सचिवपदी लक्ष्मण निवृत्ती सोलाट यांची बिनविरोध निवड झाली आहे. या तीनही निवड झालेल्या पदाधिकारी याचे महाराष्ट्र राज्य वीज कामगार संघटनेचे अध्यक्ष नागोरावजी मगर यांनी अभिनंदन केले आहे.
सरचिटणीस सयदजी जहीरूददीन आणि वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनीही या निवडीचे स्वागत केले आहे.
संस्थेचे मुख्य कार्यालय शेवगाव येथे नुकतीच निवडीची सभा झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक के. के. आव्हाड यांनी काम पाहिले.
भाऊसाहेब भाकरे पाटील यांची अध्यक्ष पदासाठीची सुचना संचालक श्रीराम जगताप यांनी मांडली. तर या सुचनेस संचालक माधव कारभारी पटारे यांनी अनुमोदन दिले.
उपाध्यक्षपदासाठी नवनाथ पोटफोडे यांची नावाची सूचना शिवाजी रामदास चितळकर यांनी केली. तर सचिन पोपट मुळे यांनी या सुचनेस अनुमोदन दिले.