अहमदनगर - सोनई येथील डॉ. भूषण रत्नाकर बिबवे, शास्त्रज्ञ, कांदा व लसुन संशोधन केंद्र, राजगुरुनगर (पुणे) यांना इन्स्टिट्युट ऑफ इंजिनियर्स (भारत) या नामांकित संस्थेद्वारे देण्यात येणाऱ्या 'यंग इंजिनियर अवार्ड-२०२१' सन्मानाने गौरवण्यात आले.
दि. २६ डिसेंबर २०२१ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे झालेल्या ३६ व्या इंडियन इंजीनियरिंग काँग्रेस आणि इन्स्टिट्युट ऑफ इंजिनियर्स (भारत) संस्थेच्या शताब्दी वर्ष सोहळ्यात त्यांना या नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री माननीय श्री महेंद्रनाथ पांडे, भारी उद्योग मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बिबवे यांना कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी आणि यांत्रिकीकरण विषयात संशोधन क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी बद्दल इंजिनीयर नरेंद्रसिंग, अध्यक्ष इन्स्टिट्युट ऑफ इंजिनियर्स भारत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.