'तो' दिवस मैत्रीचा सुवर्णक्षण असतो..

मैत्री म्हणजे फक्त छान बोलणे, चांगले म्हणणे, गोड आवाज आहे हा, किती सुंदर हसते, म्हणजे मैत्री का..? हसा, गप्पा करा, स्वतःच्या छान गोष्टी सांगा. म्हणजे मैत्री का.? 'गुड टाइम'मध्ये गप्पा करणे म्हणजे मैत्री.? नाही. हे म्हणजे वेळ घालवण्याचं साधन म्हणेल.

या सगळ्या गोष्टी मैत्रीच्या सुरवातीच्या काळात होणे साहजिक असते. ती सुरवात असते. काही काळ गेल्यानंतर त्यात प्रगल्भता यायला हवी. भावना ओळखता आल्या पाहिजे. हक्काने रागावता आलं पाहिजे, ओरडा खाता आला पाहिजे. आपले दुःख, हार, चुका सांगता आल्या पाहिजे. तर ती मैत्री मैत्री ठरते. 

'बोलायचंय थोडा वेळ काढ', असे बोलल्यावर 'फ्रीच आहे, बोल की' असे म्हणून हातातले काम बाजूला सारता आलं.. तो दिवस मैत्रीचा सुवर्णक्षण असतो. मूर्खपणाच्या गप्पा करत असतांना बंद पड यार कामं आहेत हे ऐकायला मिळणं हा एकमेकांवरील विश्वास असतो

आवाजातली कंपनं जाणून भेटायला येणं म्हणजे मैत्री. त्यात  कोणतंच नात नसते.. असते ती फक्त जाणीव.. मैत्रीची.!! ही जाणीव ज्या दिवशी हाेते, तो दिवस म्हणजेेच मैत्रीचा सुवर्णक्षण असतो.

- दिपाली विजय माळी (अहमदनगर)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !