विशेष म्हणजे लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे हा रोग पसरत असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या ३४ राज्यांतील ४०० हून अधिक लोक या आजारामुळे गंभीर आजारी पडले आहेत.
अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) ने लोकांना सावध रहायला सांगितले आहे. तसेच कांदे खाताना देखील सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
लाल आणि पिवळ्या कांद्यापासून साल्मोनेला बॅक्टेरियाचा संसर्ग अमेरिकेच्या बर्याच राज्यांत पसरत आहे, ३४ राज्यात ४०० हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.
अमेरिकेच्या सर्वात मोठ्या आरोग्य एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) ने याबाबत सतर्कता जारी करून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
तर कॅनडामध्ये साल्मोनेला बॅक्टेरियाच्या संसर्गाची घटना समोर आली आहेत. या बॅक्टेरियामुळे आतापर्यंत ६० लोक कॅनडामधील रुग्णालयात दाखल आहेत.