पुण्यातील भिडे पुलावरील रात्रीचं विहंगम दृश्य.. नदीवरील वर्दळीच्या पुलावरील किती सुंदर, डोळ्यांत साचवावा असा हा नजारा.. शहराच्या विकासाची उभारणी करणारी आपल्या शहरातील उद्याची पिढी.. का परागंदा होत चाललीय.?
शहरातील, उपनगरातील अनेक निवासी सोसायट्या, ज्या काहीं वर्षापूर्वी उत्साहाने, गर्दीने फुलून गेलेल्या असायच्या.. त्या आज इतक्या भकास का..? सेवानिवृत्तीचं आयुष्य जगणारी वृध्द मंडळी आपल्या दारात खुर्चीवर बसून आपल्या मूलाची, नातवाची वाट पाहत का कितीतरी वेळ दारात बसलेली असतात..?
रात्रीच्या रंगीबेरंगी प्रकाशातील हे दृश्य एका रसिकता जपणाऱ्या कल्पक शहराची ही ओळख...!!! आपली तरुणाई स्वप्नांच्या शोधात आपल्या शहरातून का परागंदा होत आहेत..?? याचा शोध राज्यकर्त्यांनी घ्यायला हवा.. हे आपल सुप्त दुःख आहे...
आजची पिढी तुमचं तुमच्या भोवती फिरत असलेलं राजकारण कधीही मान्य करणार नाही. त्यांना विकास हवा.. शहराने त्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात... विकासाचा कृतीशील प्रयत्न व्हायला हवा..
यातलं काहीही न करता केवळ आम्हाला पहा अन् फुले वाहा..! असंच काहीसं आपल्या शहरात होत असेल तर उद्याची पिढी तुम्हाला कधीही माफ करणार नाही... म्हणूनच अंधारलेलं आयुष्य रंगीबेरंगी करण्यासाठीं थोडे फार प्रयत्न केल्यास कितीतरी लोकांच्या दुवा तुम्हाला मिळतील...
पुलावरील रंगीत प्रकाशाचा हा सुंदर नजारा एकटक पाहताना माझ शहर डोळ्यासमोर आलं.. अन् एक हवंहवंसं स्वप्न तरळून गेलं.
- जयंत येलुलकर (अहमदनगर)