कर्नाटक - आता एकाच ठिकाणी पाच महापुरुषांचे पुतळे

मुंबई - कर्नाटकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भातील वाद निवळला आहे. आता एकाच ठिकाणी पाच महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन गावच्या ग्रामस्थांनी एकत्र येत भूमीपूजन देखील केले आहे. पुतळे उभारण्यासाठी मणगुत्ती गावच्या प्रवेशद्वाराशेजारील जागा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी तीन गावांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्याचे महाराष्ट्रातीही संतप्त पडसाद उमटले होते. आता या वादावर तेथील ग्रामस्थांनीच सांमजस्याने पडदा टाकला. 

मणगुत्ती, बुळशीनट्टी आणि बेडकोळी या तीनही गावातील ज्येष्ठांनी एकत्र येऊन महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मणगुत्ती गावच्या प्रवेशद्वाराशेजारील जागेत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, वाल्मिकी ऋषी व श्रीकृष्ण यांचे पुतळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

नियोजित ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी मिळून भूमिपूजन केले. कर्नाटकसह महाराष्ट्रात मणगुत्ती येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून सुरू झालेल्या वादावर यामुळे पडला आहे. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !