शेवगाव - येथील मैत्र पालवी ग्रुप व स्व. किसनराव काटे पा. संकुलातर्फे शिवसेना नेते प्रा.शिवाजीराव काटे यांच्या पुढाकारातून दि. 13 सप्टेंबर रोजी 150 कुटुंबाना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
शेवगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली व निसर्गाने रौद्ररूपाचे दर्शन घडविले. पूरामध्ये नदीकाठच्या शेतकऱ्यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ऊस, कापूस, तूर, ऊस, भुईमूग, उडीद, मूग,इ पिके वाहून गेली. जमिनी देखील वाहिल्या.
गायी, म्हशी, शेळ्या या पशुधनाची हानी झाली. शासनाने पंचनामे करून मदत करण्याचे आश्वासन दिले. परंतु सामाजिक भावनेच्या दृष्टीकोनातून काही संस्था, संघटना यांनी अन्नधान्य, भाजीपाला यांची मदत तातडीने केली व पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. स्व. किसनराव काटे संकुल आखेगाव तर्फे देखील अन्नधान्य व भाजीपाला स्वरूपात मदत करण्यात आली.
मैत्र पालवी ग्रुपचे सागर मेहेत्रे, श्रद्धा गोलांडे , प्रा. शिवाजीराव काटे, प्रवीण सातपुते, सचिन बाहेती, श्रीराम कुलकर्णी, रामप्रसाद व्यास, रोहिणी जाधव, जगदीश देशमुख, गोरक्षनाथ भापकर यांनी संकुलाचे विश्वस्त व शेवगाव शिवसेना शहरप्रमुख सिद्धार्थ काटे यांच्याकडे मदत सुपूर्द केली.
आखेगाव, काटेवाडी, तिरमली वस्ती, खडकी, काकडे वस्ती, गोर्डे वस्ती या ठिकाणी सिद्धार्थ काटे, दादासाहेब डोंगरे, अक्षय बोडखे, पांडुरंग नाबदे, शंकर झिंजुर्के, मंगेश डोंगरे, राजेश फुलमाळी, अनिल फुलमाळी, राजेंद्र काटे, संदीप गोर्डे यांनी नियोजन करून गरजूंना मदत पोहचवली.
यावेळी मैत्र पालवी ग्रुपचे शिवाजीराव काटे, गोरक्षनाथ भापकर उपस्थित होते. मैत्र पालवी ग्रुपमध्ये उच्चशिक्षित तरुण - तरुणींचा, अधिकारी वर्गाचा समावेश असून ग्रुप व संघटने मार्फत भविष्यात देखील ग्रामीण भागात सामाजिक कामे करण्याचा सर्व सदस्यांचा मानस असल्याचे काटे यांनी सांगितले .