सोलापूर - वर्धा येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय 'सेपक टकरा' स्पर्धेत सोलापूरच्या महिला संघाने द्वितीय व पुरुष संघाने तृतीय क्रमांक मिळवत दुहेरी मुकुट संपादन केला आहे.
याबद्दल या सर्व खेळाडूंचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व हॉलीबॉलमध्ये महाराष्ट्राचे ६ वेळा कर्णधारपद भुषविले आहे, असे महाराष्ट्राचे कर्णधार शोएब बेगमपूरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बाबासाहेब कापसे, फैज अहमद बेगमपुरे, सेपक टकरा असोसिएशनचे अध्यक्ष संजय सावंत, उपाध्यक्ष अंबादास पांढरे, सचिव रामचंद्र दत्तू, किरण स्पोर्टचे अध्यक्ष मोहन रजपूत व पंच प्रमुख श्रीकृष्ण कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेतील पुरुष व महिला संघाची कामगिरी - महिलांच्या सेमीफायनलमध्ये नाशिकने प्रथम पहिला सेट 21- 18 असा जिंकला. तर सोलापूरने दुसरा व तिसरा सेट 21- 20, 21-18 असा अनुक्रमे जिंकला.
अटीतटीच्या सामन्यात सोलापूर कडून कल्याणी बिले, नम्रता घुले, साक्षी शिंदे व अमृता जाधव यांनी विशेष कामगिरी करत संघाला अंतिम फेरीत नेले.
पुरुष संघाने प्रथम जळगाव व बीड संघाला एकतर्फी हरवत उपांत्य फेरीत गोंदिया ला 21- 16 व 21-10 असे दोन्ही सेट फरकाने हरवत पराभव केला. सेमी फायनलमध्ये सोलापूरच्या संघाचा सांगली संघाकडून पराभव झाला. सोलापूरकडून प्रतिक आसवे, संग्राम माने, नागेश सपकाळ, पार्थ पंडित यांनी विशेष कामगिरी केली.
पुरुष संघाला अंबादास पांढरे, महिला संघाला शाहनवाज मुल्ला तर संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक व असोसिएशनचे पदाधिकारी यांना जीवन ज्योती क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ सुरवसे यांच्याकडून किट भेट देण्यात आले.
सर्व खेळाडूंचे सेपक टकरा संघटनेचे उपाध्यक्ष रमेश बसाटे, खजिनदार भारत पाटील, सहसचिव शहानवाज मुल्ला, विजय दत्तू, प्रसिद्धी प्रमुख गणेश कुडले, रवी चव्हाण असोसिएशनचे सल्लागार येताळा भगत, सत्यन जाधव, बसवराज मठपती, अल्ताफ कडकाले, वीरेश अंगडी यांनी अभिनंदन केले आहे.