काळाचा महिमा..
पैसा कमवायचा...
कुणाला गचांडी धरून,
तर कुणाला मुंडी पिरगाळून..
कुणाला खड्डे खोदून,
तर कुणाला ते बुजवून..
कुणाला पाणी देऊन..
तर कुणाला डोळ्यात माती टाकून..
कोणी फसवणारा आहे,
तर कोणी बुडवणारा आहे..
कोणाला चोरी, कोणाला पाप,
कोणाला अन्याय करायचाय,
तर कोणाला बेइमानी..
मात्र पैसा कमवायचा आहे.
मजला बांधायचा आहे...
त्याच्यावर एक...
अजून एक...
खूप मजले..
उंचच उंच..
अजून उंच..
आभाळ हातात यायला हवं..
स्वर्ग दिसायला हवा....
पाऊल टाकलं की दार उघडायला हवं....
स्वागताला कमान हवी..
गळ्यात हार पडायला हवा..
स्वर्ग असायला हवा,
मजला चढायला हवा...
- जयंत येलुलकर (अहमदनगर)