संस्कार भारतीच्या 'अभंगरंग' मैफिलीने कलारसिक तृप्त

अहमदनगर - उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने संस्कार भारती, अहमदनगर समितीच्या कलाकारांनी माऊली संकुलातील मंदिरात श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी कला सेवा समर्पित करण्याच्या निमित्ताने 'अभंगरंग' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कलारसिक या मैफिलीने तृप्त झाले.


एकादशीच्या निमित्ताने सकाळी ७ वाजता मंदिरातील श्री विठ्ठल रुक्मिणी आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्तींना संस्कार भारती समितीचे अध्यक्ष अॅड दीपक शर्मा, सचिव विलास बडवे व ऊर्मिला बडवे यांच्या हस्ते महाभिषेक करुन विधीवत पूजा व आरती करण्यात आली.

सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ संगीततज्ञ श्रीराम तांबोळी यांनी सपत्नीक ज्ञानेश्वर माऊलींचे पूजन केले. सभागृहाच्या प्रवेशद्वारी गार्गी व्यवहारे, गितांजली कुरापाटी आणि समृद्धी बापट यांनी रेखाटलेल्या सुबक रांगोळीने सर्वांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे सुरुवातीला संस्कार भारतीचे प्रथेप्रमाणे मंचावर समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी ध्येयगीत गायले. या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. रविंद्र साताळकर,  माऊली संकुलचे पदाधिकारी तुकाराम सुतार व भालेराव, दीपक शर्मा, विलास बडवे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व नटराज पूजन झाले.

प्रास्ताविकात विलास बडवे यांनी, संस्कार भारतीच्या कलाकारांवर विश्वास ठेवून कला सेवेच्या तीन संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माऊली संकुलच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. ही सेवा अखंड चालू राहिल, असे आश्वासन दिले.


संस्कार भारती ही कलेच्या संवर्धनासाठी काम करणाऱी संस्था आहे. या आणि अशा विविध कार्यक्रमांचे माध्यमातून नवनवीन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे कलासाधक आणि कलारसिक यांनी संस्कार भारतीशी आपलं नातं जोडावं. कलावंत कोणत्याही कलेचा साधक असो, त्याचे स्वागतच होईल.

माऊली वाचनालयाचे अध्यक्ष तुकाराम सुतार म्हणाले, आमच्या इच्छेप्रमाणे व आम्ही केलेल्या विनंतीनुसार कार्तिकी एकादशी, आषाढी एकादशी आणि ज्ञानेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनी संस्कार भारती अतिशय उत्तमरीत्या गायनसेवा देत आहे. ही सेवा अशीच सातत्याने घडत राहो.

डॉ. साताळकर यांनी संस्कार भारतीच्या कार्याप्रती आनंद व समाधान व्यक्त केले आणि समितीच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन अपर्णा बालटे यांनी केले. यानंतर संस्कार भारती समितीच्या नृत्यविधा प्रमुख वर्षा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गोजिरी भावसार हिने नृत्याद्वारे गणेशवंदना सादर केली. 

'अबीर गुलाल उधळीत रंग', पैल तोगे काऊ कोकताहे, माझे माहेर पंढरी, आणि माऊली माऊली रुप तुझे या अभंगांवर मृणाल घोडके, गोजिरी भावसार, गौरी कुलकर्णी, आश्लेषा पोतदार, श्रुती बडवे, ईश्वरी काळे, ऋतूजा खटके, ईश्वरी जाधव, रिया शेळके यांनी आकर्षक नृत्याविष्कार सादर केले.

यानंतर नृत्यदिंडी काढली दिंडीत निलाक्षी वामने, आराध्या सोनवणे, अद्विता मेतकर या बालकलाकारांनी नृत्यदिंडी सादरकरुन रसिकांना साक्षात पंढरपूरची अनुभूती दिली. मानवी डेरे हिने साकारलेले श्री विठ्ठलाचे रुप लक्षवेधी ठरले. माऊली संकुलचे पदाधिकारी दिनकर घोडके यांनी सर्व कलाकारांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. संस्कार भारतीचे मंत्री महेश कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !