सिनेवृत्त - 'बाहुबली'चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आगामी सिनेमा 'RRR' याची चाहते खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा जानेवारी २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. पण, 'निर्मात्यांनी या सिनेमाच्या प्रमोशनबाबत थोडा 'वेगळा' निर्णय घेतला आहे.
या सिनेमाचे निर्माते भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रमोशनल कार्यक्रममुंबईत आयोजित करत आहेत. हा एक व्हिज्युअल प्रेक्षणीय कार्यक्रम असेल. यामध्ये संपूर्ण कलाकार आणि क्रू इंडस्ट्रीतील मोठ्या व्यक्तींसह एकत्र दिसणार आहेत. दि. १९ डिसेंबर रोजी हे प्रमोशन होणार आहे.
अजय देवगण, राम चरण, आलिया भट्ट आणि ज्युनियर एनटीआर अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'RRR' हा एक मोठा थ्रिलर सिनेमा आहे आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून त्याला मोठा चाहतावर्ग मिळाला आहे. युट्युबवर या सिनेमाचे व्हिडिओ लाखो-करोडो लोकांनी पाहिले आहेत.
सहसा असे म्हटले जाते की, या कार्यक्रमांचे प्रमाण सामान्य चित्रपटाच्या बजेटइतके असते. प्रत्येक मुख्य अभिनेत्याची या कार्यक्रमात यापूर्वी कधीही झाली नाही, अशी 'एंट्री' होणार आहे'. तसेच, मुख्य कलाकार प्रेक्षकांसाठी मोठ्या प्रमाणात 'परफॉर्म' करणार आहेत, ही एक विशेष गोष्ट आहे.
'बाहुबली'फेम SS राजामौली दिग्दर्शित 'RRR' या सिनेमात मुख्य अभिनेते राम चरण आणि ज्युनियर NTR व्यतिरिक्त अजय देवगण, आलिया भट्ट, ऑलिव्हिया मॉरिस प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर समुथिरकानी, रे स्टीव्हन्सन आणि एलिसन डोडी सहाय्यक भूमिकेत आहेत.
'RRR' हा सिनेमा दि. ७ जानेवारी २०२२ रोजी जगभरातील सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. परंतु, तत्पूर्वीच त्याच्या प्रमोशनवर होत असलेल्या तयारीमुळे तो आणखीनच चर्चेत आला आहे.