अशी धावली पुणे मेट्रो

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी रिमोटचे बटन दाबून पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

वनाज ते आयडियल कॉलनी दरम्यान मेट्रोची धाव


वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिके अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात मेट्रोची चाचणी पार पडली. तीन डब्यांच्या दोन मेट्रो रेल्वेद्वारे ३.५ किलोमीटर अंतरात ही चाचणी घेण्यात आली. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती.

चाचणीनंतर ऑक्टोबर अखेरपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याचे महामेट्रोच्या विचाराधीन आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !