शेवगाव - आव्हाणे बु. येथील ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कळमकर यांची भाजपा युवा मोर्चा शेवगाव तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाली.
या निवडीबद्दल राष्ट्रीय मानव सुरक्षा सेवा संघाच्या वतीने कळमकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी राष्ट्रीय मानव सेवा संघाचे शेवगाव तालुकाध्यक्ष लोढे, तालुका सचिव प्रमोद झिरपे, तालुका कार्याध्यक्ष प्रवीण कळमकर, आदिनाथ झिरपे, नवनाथ दिघे, अर्जुन तागड आदी उपस्थित होते.