रावसाहेब पटवर्धन पतसंस्था घोटाळा ! 'या' चारही आरोपींचे जामीन फेटाळले

अहमदनगर - रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ६५ कोटींच्या घाेेटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी दि. २६ नोव्हेंबर रोजी चार आरोपींना अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

या घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तत्कालीन अध्यक्षा व संचालिका लतिका नंदकुमार पवार, उपाध्यक्ष सुभाष विद्याधर रेखी, संचालक लक्ष्मण सखाराम जाधव व प्रकाश नाथ्यु सोनवणे यांना अटक केलेेली आहे. तर ईस्माईल गुलाब शेख यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.

रावसाहेब पतसंस्थेचे फॉरेन्सिक ऑडीट केल्यानंतर त्यात तब्बल ६५ कोटी ३१ लाख ८० हजार २५३ रूपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. तसा अहवाल ऑडीटर यांनी नोंदवला होता. तेव्हापासून पोलिस आरोपींच्या मागावर होते. अटकेत असलेल्या आरोपींची पोलिस कोठडीची मुदत २ डिसेंबर रोजी संपली.

त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. जिल्हा न्यायाधीश बी. एम. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी जामीन देण्यास विरोध दर्शवला. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून सखोल तपास करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.

या पतसंस्थेतील २४८ ठेवीदार चौकशी अधिकाऱ्यांकडे गेले आहेत. त्यांचे जबाब नोंदवले आहेत. या ठेवीदारांच्या मुदतठेव पावतीची मुदत संपलेली आहे. तरीही त्यांना अजून पतसंस्थेने पैसे दिलेले नाहीत. त्या रकमेवरील व्याज देणेही पतसंस्थेने बंद केले, असे पवार युक्तीवादात म्हणाले.

ऍड. पवार यांचा प्रखर युक्तीवाद, तसेच आर्थिक गुन्हे शाखा करत असलेल्या गुन्ह्याचचा तपासातील प्रगती अहवाल, त्यासोबतचे सर्व कागदपत्रे, फॉरेन्सिक ऑडिटचा रिपोर्ट ग्राहय धरून न्यायालयाने सर्व आरोपींचे जामीन अर्ज बुधवारी फेटाळून लावले आहेत.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !