अहमदनगर - राजकारणात पराभव विसरून लोकांची कामे करायची असतात. पण काही जणांना पराभव पचवता येत नाही. आपल्या पराभवात ज्यांचा वाटा आहे, त्यांचाच काटा काढायचे प्रयत्न केले जातात. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना कोणी नादी लागू नका, असा इशारा मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
image source : Twitter |
तनपुरे हे नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलत होते. काही दिवसांपूर्वीच तनपुरे समर्थक असलेले नगर तालुक्यातील माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे, त्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांनी कोणाचेही नाव न घेता हा इशारा दिला आहे.
तनपुरे म्हणाले, आमच्या निष्पाप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना बदनाम केले जात आहे. परंतु, ज्यांनी हा डाव टाकला आहे, तो त्यांच्यावरच उलटू शकतो, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. तनपुरे यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख कोणाकडे होता, याची चर्चा सुरू होती.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, संदेश कार्ले, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, संदीप गुंड, रोहीदास कर्डिले, केशव बेरड, प्रविण कोकाटे, दत्ता तापकिरे, सचिन जाधव, अनिल बोरुडे, अभिषेक भगत, अमोल जाधव हे उपस्थित होते.
ही बातमीही वाचा - माजी पंचायत समिती सदस्य गोविंद आण्णा मोकाटेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा