माझं आवडतं गाणं - मेरा कुछ सामान (सिनेमा - इजाजत)

गायिका - आशा भोसले
गीतलेखन - गुलजारजी 
संगीत - आर. डी. बर्मन


ही सारी दैवी देणगी असलेली माणसं एकत्र येतात.. आणि जन्म घेते एक भावूक गीत. चित्रपटांचा नायक महेंद्र सुधाशी लग्न झाल्यावर त्यांच्या प्रेमाच्या आठवणीं मायाला परत देतो. आता प्रेमाच्या शपथा जणू खोट्या ठरल्या आहेत. माया सैरभैर होतेय.. आपल्या तुटलेल्या हृदयाला एकत्र करत ती त्याला आपण घालवलेले क्षण, आठवणीं परत देशील का, असं विचारतेय.

पतझड में कुछ पत्तों की गिरने की आहट
कानो में एक बार पहन के लौट आई थी
पतझड की वो शाख अभी तक कांप रही है
वो शाख गिरा दो, मेरा वो सामान लौटा दो

त्या आठवणींच्या  झाडांच्या पानांची सळसळ तु एकच घाव घालून संपवून टाक.. पण माझे क्षण आठवणी परत कर... हे मागण्याचं कारण काय.? तर सुधा (महेंद्रची बायको) लग्नानंतर घरात आल्यावर मायाच्या सगळ्या वस्तू मायाकडे परत पाठवते. त्या महेंद्रनेच पाठवल्यात असं समजून माया त्याला जे पत्र लिहिते.. ते पत्र, त्या भावना, तिच्या वेदना म्हणजेच 'मेरा कुछ सामान..'


या पत्रातल्या ओळींमध्ये आशाताई, पंचमदा यांनी जीव ओतलाय. आशाताईंचा ओल्या व्यथेचा कातर करणारा आवाज.. काळजाला भिडतो. त्यात भर म्हणजे पंचमदांचं जीवघेणं संगीत. 'एक अकेली छत्री मे जब आधे आधे भिग रहे थे' या ओळीनंतर जे काही सेकंद बीट्स आहे ना, ते कुणीतरी आपल्याच काळजावर घाव घालतंय की काय, असं वाटतं..

एक अकेली छतरी में आधे आधे भिग रहे थे...
आधे सुखे आधे गीले, सुखा तो मैं ले आयी थी
गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो..
वो भिजवा दो, मेरा 'वो' सामान लौटा दो..

एका प्रेमाच्या छत्रीत न्हाऊन निघत होतो... आता शुष्क झालेलं प्रेम मी घेऊन आलेय.. पण काही ओलावा आहे का तुझ्याकडे..? इथे गुलजारजी 'शायद' हा शब्द वापरताहेत... म्हणजे ही आशा आहे.. मग दोघांनी एकत्र घेतलेल्या त्या प्रेमाच्या शपथा ती परत मागतेय...

एक सौ सोलह चाँद की राते, 
एक तुम्हारे कांधे का तिल
गिली मेहँदी की खुशबू ,
झुठमुट के शिकवे कुछ 
झुटमुठ के वादे भी सब 
याद करा दूँ, सब भिजवा दो 
मेरा वो सामान लौटा दो...

सहवासातील कित्येक क्षण तिला आता पुन्हा आठवताहेत, ती खोटी खोटी भांडण.. त्या खोट्याचं होत्या आणाभाका.. पण ते सारं तिला, 'माया'ला परत हवंय.. आणि हे सगळं काय परत देता येणार आहे का..? नाहीच. तरीही ती मागतेय. आणि शेवटी ती आर्तपणे म्हणतेय.. 

एक इजाजत दे दो बस, 
जब इसको दफनाउँगी.... 
मैं भी वही सो जाऊँगी,
मै भी वही सो जाऊँगी..

आता महेंद्र दुसऱ्यांचा आहे, हे सत्य माया तळमळतच स्विकारतेय. ह्या आठवणींबरोबर तिलाही संपून जायचं आहे. आपल्याला वाटतं मायाने हा विरह स्विकारला आहे. हे स्विकारणं खर आहे का..?

प्रेमात हरलेली माणसं असं सारचं गमावून बसतात... अन मग अशा आठवणींच्या कबरी उभ्या राहतात... आशाताईंच्या शिवाय हे गाणं.?? अंह. आपण कल्पनाही करु शकत नाही.. तो आर्तपणा आवाजात उतरला आहेच, पण अनुराधा पटेलच्या या चित्रपटांतील अभिनयाला सलाम... या गाण्यातली ती कधीच विसरली जात नाही.

गुलजारजी एकदा या गाण्याबद्दल बोलताना म्हणाले होते, ये विरह का बिछडने का दर्द होता है ना, वो भुला नही जाता... कुछ यादे हमेशा अपने साथ रहती है...! ते स्वतःच्याच वेदनांबद्दल बोलत असावेत का, ते मला असंच वाटतं..

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !