सामाजिक संस्थांची बैठक, 'महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन'ने केला 'हा' निर्धार

अहमदनगर - आज राज्यात सामाजिक संस्थांची परिस्थिती खूप वाईट आहे. बोटावर मोजता येतील एवढ्या संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. बाकीच्या फक्त कागदावरच आहेत. 

म्हणून या सर्व सामाजिक संस्थांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकारातून महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन काम करणार असल्याचे प्रतिपाद संस्थापक अध्यक्ष दीपक आगळे यांनी केले.

रविवारी अहमदनगर शहरामध्ये महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनची आढावा बैठक व पदाधिकारी निवड पत्र वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आगळे बोलत होते. 

यावेळी प्रदेश उपाध्यक्षा विद्या बेनगुडे, प्रदेश सरचिटणीस सुनील मतकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रकाश पवार, प्रदेश कार्याध्यक्ष अधिकराव जगताप, प्रदेश सचिव अभिषेक पटारे, नितीन दांडगे, जिल्हाध्यक्ष वसंत कर्डिले, उपस्थित होते.

दीपक आगळे म्हणाले, राज्यातील सामाजिक संस्थांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी एकत्र आलो आहोत. सामाजिक संस्थांना शासकीय अनुदान, सीएसआर फंड ऑडिट, वार्षिक अहवाल, चेंज रिपोर्ट करणे, राज्य शासनाचे व केंद्र शासनाच्या अनेक योजना याविषयी मार्गदर्शन नसल्याने अनेक संस्था बंद पडत आहेत.

यावेळी शहराध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. अंजली काळे, ऋषिकेश बेल्हेकर, जिल्हा कार्याध्यक्ष तारामती दिवटे, ऋषिकेश येवले, कानिफनाथ सावंत, अ‍ॅड. अर्जुन काळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाची संस्कृती व सामाजिक कार्य टिकून राहण्यासाठी सामाजिक संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या तरच देश महासत्ता होईल, असे आगळे यावेळी म्हणाले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !