केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते शुभारंभ
देवळाली (जि. नाशिक ) – दानापुर किसान पार्सल एक्सप्रेस चा शुभारंभ आज केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते व्हिडीओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रेल्वे, वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल होते. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पुरषोत्तम रुपाला, कैलास चौधरी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, आणि यांच्यासमवेत आमदार सरोज अहिरे आदी व्हिडिओ लिंकद्वारे या कार्यक्रमास उपस्थित होते.
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल, भुसावळ मंडलचे मंडल रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता, देवळाली स्टेशन येथे अप्पर मंडल रेल प्रबंधक मनोज सिन्हा उपस्थित होते. वरिष्ट मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटिल, वरिष्ट मंडल परिचालन प्रबंधक आर. के. शर्मा आणि सर्व शाखाचे अधिकारी व्हिडिओ लिंकद्वारे उपस्थित होते.